मानवत तालुक्यातील नागर जवळा येथील आसाराम बाबूराव होगे यांच्या किराणा दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी २७ जुलैच्या रात्री दुकानातील शेंगदाने, शाबुदाणा, गोडतेल, मसाले पुडे, साबन, बिस्कीट पुडे आदी साहित्य चोरून नेल्याची बाब २८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली ; परंतु होगे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. १६ ऑगस्ट रोजी मानवत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली. त्यांनी नागरजवळा येथील किराणा दुकान फोडल्याची कबुली दिली. त्यानंतर किराणा दुकानदार आसाराम होगे यांनी १६ ऑगस्ट रोजी मानवत पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. भीतीपोटी आपण फिर्याद दिली नव्हती, असे यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल मारोती पवार,अर्जुन मारोती पवार व श्रावण सुखदेव पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.१६/०८/२०२१ मी आसाराम बाबूराव होगे वय- ५५ वर्ष,व्यवसाय-किराणा दुकान रा. नागरजवळा ता.मानवत जि.परभणी मो.८२६१०६८२९२.समक्ष पोस्टे मानवत येथे हजर राहून फिर्याद लिहून देतो की,मी वरील ठिकाणी पत्नी व मुलाबाळांसह राहतो. माझे किराणा दुकान असून ते नागरजवळा पाटीवर मानवत रामेटाकळी रोडवर असून ते मी चालवितो.दिनांक २७/०७/२०२१ रोजी रात्री नऊ वाजता मी माझे किराणा दुकान बंद करून घरी गेलो व सकाळी दिनांक २८/०७/२०२१ चे साडेसहा वा.सु दुकान उघडण्यासाठी गेलो असता.माझे किराणा दुकान शिवशंभो किराणाचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटर वाकवून माझे दुकानातील खालील वर्णनाचा माल चोरून नेला आहे.१) ५००- ५ किलोचे शेंगदाणाचे पाकीट कि.अ २) ४००-४ किलोचे शाबुदाना पाकीट कि.अ ३) २०००- बिस्कीट पुडे कि.अ ४) ९००- गोडतेला सोयाबीन पुडे ०७ नग कि.अ ५) ७००- प्रवीण मसाले पुडे कि.अ ७पुडे ६) २०० - कोलगेट २०० ग्राॅम पाकीट कि.अ ७) ३४०-संतुर साबन तीन डझन कि.अ ८) २००-व्हील कपड्याची साबन १० नग कि.अ ५२४० असा वर नमूद एकूण पाच हजार दोनशे चाळीस रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे शिवशंभो किराणा दुकानाचे शटर वाकवून दिनांक २७/०७/२०२१ चे रात्रीचे नऊ ते दिनांक २८/०७/२०२१चे सकाळी साडे सहा वा.सु चोरून नेले आहे.दिनांक १६/०८/२०२१ रोजी पोलीस स्टेशन मानवत येथील अटक असलेला इसम नामे अनिल मारोती पवार,अर्जुन मारोती पवार दोन्ही रा.खडकवाडी ता.मानवत यांनी पोलिसांना आम्ही व आमचे सोबत श्रावण सुखदेव पवार रा. वसमत जि.हिंगोली अशांनी मिळून माझे दुकान फोडून चोरी केल्याचे सांगितले त्यावरून वर नमूद आरोपींना पोलीस माझे दुकानावर घेऊन आल्यावर माझे दुकान दिनांक २७/०७/२०२१ चे मध्यरात्री चे सुमारास त्यांनीच शटर वाकवून चोरी केल्याचे सांगितले आहे.मी भीतीमुळे आजपर्यंत चोराविरूद्ध तक्रार दिली नव्हती परंतु आज रोजी मला वर नमूद चोरट्यांनी माझे दुकानात चोरी केल्याची माहिती मिळाल्यामुळे माझी वर नमूद तीन चोरट्याविरूद्ध तक्रार आहे.मी दिलेली तक्रार माझे सांगणेप्रमाणे लिहिली ती मला मराठीतून वाचून दाखविली बरोबर व खरी आहे. समक्ष फिर्याद दिली सही १६/०८/२०२१ १९:२० वाजता मानवत