लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी- दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा आणि शेतीचे संभाव्य नुकसान टळावे, या उद्देशाने जिल्ह्यात वर्षभरापूर्वी उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थिती गंज चढल्यागत झाली आहे़ ग्रामीण भागातील मंडळ कार्यालयांतर्गत उभारलेल्या या हवामान केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत़ हवामानाची नोंद घेणारे काही यंत्रे झुडपामध्ये झाकून गेली असल्याचे ‘लोकमत’ने जिल्हाभरात केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले़ विशेष म्हणजे या स्वयंचलित हवामान केंद्रांचे नियंत्रण कसे होते? त्यातील माहिती कुठे जाते, ती कोणाला मिळते? शेतकºयापर्यंत ही माहिती पोहोचते का? आणि प्रत्यक्ष हवामान केंद्रांचा योग्य वापर सुरू झाला का? याची माहितीच अधिकाºयांना नसल्याचे दिसून आले़सेलू तालुक्यातील सेलू व देऊळगाव येथे उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांची मंगळवारी पाहणी केली तेव्हा हे केंद्र बेवारस स्थितीत असल्याचे आढळले़ कृषी विभाग या केंद्रांविषयी अनभिज्ञ असल्याने तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र शोभेची वास्तू बनल्याचे दिसून आले़तालुक्यातील देऊळगाव गात येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात ही यंत्रणा उभारली आहे़ या ठिकाणी भेट दिली तेव्हा थातूर-मातूर तारेचे कुंपण करून त्यात हे यंत्र उभारल्याचे दिसून आले़ आठवड्यातून एक-दोन वेळा संबंधित कर्मचारी केंद्रस्थळी भेट देत असल्याची माहिती मिळाली़ त्या त्या परिसरातील हवामानाची अचूक माहिती नोंद करण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे़ या माहितीच्या आधारे शेतकºयांना योग्य हवामानाचा व कृषीविषयक सल्ला देता यावा, असा उद्देश आहे़ मात्र प्रत्यक्षात गावातील एकाही शेतकºयाला आतापर्यंत असा सल्ला मिळाला नसल्याचे शेतकºयांनी सांगितले़ या केंद्रातून जिल्हास्तरावर नोंदी घेतल्या जातात, अशी माहिती तालुका कृषी विभागातील कर्मचाºयांनी दिली़ तालुक्यात उभारलेल्या केंद्रांची माहिती कृषी विभागाकडे विचारल्यानंतर या विभागातील अधिकाºयांनी तालुक्यात हे केंद्र कुठे कुठे उभारले आहे? याचा शोध घेतला़ त्यानंतरच सेलू तालुक्यात पाच स्वयंचलित हवामान केंद्र असल्याचे अधिकाºयांना समजले़जलविज्ञान प्रकल्पाचीही दुरवस्थासेलू तालुक्यातील हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी २००९ मध्ये शहरात जलविज्ञान प्रकल्प उभारण्यात आला़ या प्रकल्पातील विविध मापके, गवतांनी वेढली आहेत़ काही मापकांची तर दुरवस्थाही झाली आहे़ अनेक वर्षांपासून प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ त्यामुळे या प्रकल्पातील नोंदीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, पाण्याचे बाष्पीभवन, वाºयाचा वेग आदी नोंदी घेतल्या जातात़ मात्र त्या कुठे दिल्या जातात? आणि या नोंदीवरून कोण निष्कर्ष काढते या संदर्भात महसूल विभागही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले़मानवत तालुक्यात कोल्हा, मानवत, केकरजवळा या तीन मंडळांत उभारलेले स्वयंचलित हवामान केंद्र धूळखात पडून आहेत़चार महिन्यांपूर्वी या केंद्रांची उभारणी झाली़ केकरजवळा येथे ग्रामपंचायत परिसरात असलेल्या हवामान केंद्रावर नोंदी घेण्यासाठी खाजगी व्यक्तींची नियुक्ती केली़ मात्र नोंदी घेतल्या जात नसल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीत ग्रामस्थांनी सांगितले़ कोल्हा येथे आरोग्य केंद्र परिसरात भेट दिली तेव्हा हवामान केंद्राच्या ठिकाणी अधिकृत व्यक्ती आढळला नाही़ मानवत तहसील कार्यालय परिसरात बसविलेल्या हवामान केंद्रातील नोंदी लिपिक घेत असल्याची माहिती देण्यात आली़ मात्र केवळ पावसाळ्यातच हे केंद्र उपयोगात येते़ केंद्राच्या परिसरात अस्वच्छता पहावयास मिळाली़ त्यामुळे या केंद्रांचा उद्देश अद्यापही साध्य झाला नसल्याचे दिसत आहे़गंगाखेड तालुक्यातही उभारलेले स्वयंचलित हवामान केंद्र धुळीच्या सान्निध्यात असल्याचे पहावयास मिळाले़ तालुक्यात गंगाखेड, माखणी, महातपुरी आणि राणीसावरगाव मंडळात हे केंद्र उभारले आहे़ या केंद्रांची पाहणी केली तेव्हा डेटा लॉगर, सेन्सर, सोलार पॅनल, बटरी आदी उपकरणे धुळीच्या सान्निध्यात दिसून आली़ महावेधने उभारलेल्या या यंत्रणेविषयी स्थानिक तहसीलदार प्रशासन अनभिज्ञ असल्याचेही आजच्या पाहणीत समोर आले़जिंतूर तालुक्यात जिंतूर, सावंगी म्हाळसा, बोरी, आडगाव, चारठाणा व बामणी या ठिकाणी स्वयंचलित यंत्र बसविले आहेत़ या यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात धुळ साचल्याचे दिसून आले़ या यंत्राद्वारे हवामानाचा प्राथमिक अंदाज, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अल्प पर्जन्यमान, तापमान, वाºयाचा वेग, दिशा आदी माहिती मिळू शकते़ परंतु, हे पूर्णा तालुक्यात पूर्णा, ताडकळस, चुडावा, कात्नेश्वर, लिमला या पाच ठिकाणी बसविलेले स्वयंचलित यंत्र झाडाझुडपांच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले़ हे यंत्र सुरू आहेत की बंद याची माहितीही स्थानिक अधिकाºयांकडे नव्हती़ यंत्रणा तपासण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी फिरकत नसल्याचे सांगण्यात आले़ लिमला येथे स्मशानभूमीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत हे स्वयंचलित हवामान यंत्र बसविले आहे़ हे यंत्र स्वयंचलित असल्याने कर्मचाºयांची आवश्यकता नसल्याचे सांगितले जात असले तरी या यंत्रांविषयी कृषी, महसूल विभागाकडे कुठलीही माहिती नव्हती़ महावेधने उभारलेल्या या प्रकल्पाद्वारे शेतकºयांना कृषीविषयक सल्ला मिळावा, कृषी व हवामान क्षेत्रात संशोधन व्हावे, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये या यंत्राच्या माहितीचा वापर होवू शकतो़ परंतु, स्वयंचलित यंत्रेच दुर्लक्षित असल्याने शासनाचा हेतू असफल ठरत आहे़ यंत्र आॅपरेट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही़ सर्व नोंदी आॅनलाईनप्रमाणे आहेत़
परभणी जिल्ह्यातील परिस्थिती :स्वयंचलित हवामान केंदे्र ठरली कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:31 AM