परभणी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:39 AM2020-02-07T11:39:30+5:302020-02-07T11:42:47+5:30

मनपाची एकहाती सत्ता काँग्रेसकडे आहे

Congress victory in Parbhani Municipal Corporation by-election | परभणी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय

परभणी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय

Next
ठळक मुद्दे ६५ सदस्यांच्या सभागृहात या पक्षाचे संख्याबळ आता ३१ झाले आहे.

परभणी: येथील महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १४ अ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार खान शहनाजबी अकबर खान यांनी १ हजार ३२८ मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सय्यद महेबूब अली सय्यद अहमद अली यांचा पराभव केला आहे.

परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १४ अ साठी गुरुवारी मतदान झाले. त्यामध्ये १५ हजार २५४ पैकी ७ हजार ४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शुक्रवारी सकाळी १० वाजता शहरातील कल्याण मंडपम सभागृहात मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार खान शहनाजबी अकबर खान यांना ४ हजार २७९ तर राष्ट्रवादीचे उमेदवार सय्यद महेबूब अली सय्यद अहमद अली यांना २ हजार ३५१ मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार सतीश फटके यांना फक्त ७०९ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लोखंडे यांनी काँग्रेसच्या उमेदवार खान शहनाजबी अकबर खान यांना विजयी घोषित केले. मनपाची एकहाती सत्ता काँग्रेसकडे असून ६५ सदस्यांच्या सभागृहात या पक्षाचे संख्याबळ आता ३१ झाले आहे.

Web Title: Congress victory in Parbhani Municipal Corporation by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.