वजन वाढले कारण
शाळा बंद असल्याने लहान मुलांच्या शारीरिक, तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
शाळेत एकत्रित खेळणे, तसेच शाळा परिसरात येरझाऱ्या मारणे बंद झाले.
शाळेचा अभ्यास सध्या बंद आहे. यामुळे हा ताण कमी झाला आहे.
व्यायाम तसेच सायकलिंग बंद झाल्याने स्थूलता वाढू शकते.
मैदानी खेळ बंद झाल्याने वाढतोय धोका.
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
पालकांनी दररोज लहान मुलांसोबत इनडोअर गेम खेळावेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये पालेभाज्या, कडधान्य यांचा समावेश जास्त प्रमाणात करावा. हाॅटेलचे जेवण, तसेच फास्टफूड, चिप्स या बाबी देणे टाळावे. जेवणाच्या वेळा ठरवून त्यांना मोकळ्या मैदानात खेळायला न्यावे.
डाॅक्टर म्हणतात...
सध्याचे बदललेले वातावरण पाहता लहान मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी लहान मुलांना संतुलित आहार द्यावा व त्यांच्याकडून दररोज त्यांना झेपेल तो व्यायाम करून घ्यावा. बैठे काम न करता टी.व्ही, मोबाईल यांचा वापर कामापुरता करावा.
- डाॅ. श्याम जेथलिया, बालरोगतज्ञ.