परभणी : मानवत शहरात मागील आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, खेळाची मैदाने आदी गर्दीची ठिकाणे दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी घेतला आहे.
मानवत शहरात मागील आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली होती. जिल्ह्यात हा कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ५ ऑक्टोबर रोजी आदेश काढून मानवत शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आणि खेळाची मैदाने आदी ठिकाणे १६ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
‘येलदरी’चे दहा दरवाजे पुन्हा उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली
शहरातील सर्व व्यावसायिक, व्यापारी, कामगारांच्या आरटीपीसीआर चाचण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, मागच्या तीन महिन्यात अनलॉकच्या प्रक्रियेनंतर प्रथमच मानवत शहरांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.