मागच्या एक-दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले असले तरी रुग्णांच्या वाढत्या संख्येला अजूनही अटकाव बसलेला नाही. १६ मार्च रोजी आरोग्य विभागाला आरटीपीसीआरच्या ६२७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ११६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ९ हजार ५३६ रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी ८ हजार ६४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३४६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ५४१ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९५ झाली आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात १३५ रुग्ण उपचार घेत असून, ३११ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत.
या भागात आढळले रुग्ण
परभणी शहरातील शिवाजीनगर, अमिन कॉलनी, त्रिमूर्तीनगर, वैभवनगर, शिवाजी चौक, खासगी रुग्णालय, विष्णुनगर, शिवरामनगर, नाथनगर, खंडोबा बाजार, कोमटी गल्ली, लक्ष्मीनगर, गांधी पार्क, कृषी सारथी कॉलनी, लोकमान्यनगर, स्टेशन रोड, गुजरी बाजार, सुयोग कॉलनी, भाग्यलक्ष्मीनगर, गजानननगर, गणेशनगर, आझम चौक, नवा मोंढा, रामकृष्णनगर, वकील कॉलनी, राणी लक्ष्मीबाईनगर, इंदिरानगर, अपना कॉर्नर, भाजी मंडई, नानलपेठ, विसावा कॉर्नर, पार्वतीनगर, दत्तनगर जिंतूर रोड, संत तुकारामनगर, कल्याणनगर, यशोदानगरी, रंगनाथनगर, मथुरानगर, साखला प्लॉट, काद्राबाद प्लॉट, गव्हाणे रोड, धनलक्ष्मीनगर आदी भागांमध्ये रुग्णांची नोंद झाली आहे.