सेलू : सेलू शहरात परदेशातून परतलेल्या सर्व 11 व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने शहराला दिलासा मिळाला आहे. मात्र यानंतर ही काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी व्यक्त केले.
जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर परदेशात राहत असलेले नागरिक मायदेशी परतली आहेत. यात पर्यटन करण्यासाठी विदेशात गेलेल्या नागरिकांनची संख्या अधिक आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने परदेशातून परतलेल्या नागरिकांंची माहिती घेतली, त्यांचे स्वॅब घेऊन चाचणी केली. यात सेलू शहरात परतलेल्या सर्व 11 नागरिकांंचे अहवालगेटिव्ह आले आहेत. माञ त्यांना क्वारंटाईन केले आहे.
मागील दहा दिवसात सेलू शहरात अमेरिकेतून पाच, दुबई येथून चार तर रशियातून दोन नागरिक परतले आहेत. या सर्वाची तपासणी करण्यातआली तसेच स्वॅब घेऊन चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. सर्व अकरा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. माञ नागरिकांनी घरा बाहेर पडू नये, काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे सांगितले.