या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल पाटील यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स प्रिन्सचे उपाध्यक्ष रोहित गर्जे, ॲक्टिव्हिटी चेअरपर्सन अरुण टाक, रिजन चेअरपर्सन डॉ. प्रवीण धाडवे, झोन चेअरपर्सन संतोष नारवाणी, संतोष तापडिया, कारेगावचे सरपंच लिंगायत, ग्रामसेवक गायकवाड, प्रिन्सचे सचिव मनोहर चौधरी व कोषाध्यक्ष श्रीनिवास भुतडा यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. डॉ. पाटील म्हणाले की, कोरोना कालावधीत कोरोना योद्धांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. या योद्धांचा लायन्सने गाैरव करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमात रुग्णवाहिका चालक, शववाहिनी चालक, स्मशानभूमीतील कर्मचारी, मनपा कर्मचारी, वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी, गॅस सिलिंडर वितरक कर्मचारी यांचा सन्मानपत्र व १ लाखाचा अपघाती विमा देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब प्रिन्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
लायन्स क्लब प्रिन्सकडून कोरोना योद्धांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:24 AM