लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून, गुरुवारीही दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासियांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
मागील आठवडाभरापासून दररोज कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत. बुधवारी जिल्ह्यात बारा रुग्णांचा मृत्यू झाला होता तर गुरुवारी दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयातील पाच आणि खासगी रुग्णालयातील पाच अशा दहा पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणीत रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. दिनांक ८ एप्रिल रोजी दोन हजार २४९ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १,६१७ अहवालांमध्ये ४६४ आणि ॲन्टिजेनच्या ६३२ अहवालांमध्ये २४९ नागरिक पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १८ हजार ६५९ झाली असून, त्यापैकी १४ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,७८६ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटी रुग्णालयामध्ये १६४, जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात १९०, अक्षदा मंगल कार्यालय येथे १३० आणि गृह अलगीकरणामध्ये दोन हजार ८२७ रुग्ण उपचार घेत आहेत.