सेलू:- येथील राज मोहल्ला येथील एक (५५) वर्षीय महिला नांदेड मध्ये कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने सेलूत दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली असून त्या महिलेच्या संपर्कातील ३४ व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत पाठवले आहेत. गुरूवारी रात्री पर्यंत अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली.
राज मोहल्ला परिसरातील एक महिलेला दुर्धर आजार असल्याने औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेऊन २७ एप्रिल रोजी ही महिला खाजगी कारने सेलू येथील घरी परतली होती. त्यानंतर या महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला रूग्णवाहिकेतून परभणी येथील रूग्णालयात नेण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी त्या महिलेला उपचारासाठी नांदेडला पाठवले. तेथे तपासणीत ही महिला कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने बुधवारी रात्री पासूनच प्रशासनाने दोन दिवसाची संचारबंदी लागू केली.तसेच महिलेच्या कुटूंबातील १९ सदस्य व रूग्ण वाहिका चालक आणि अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या एकूण ३४ व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणी साठी औरंगाबाद येथे पाठवले आहेत. गुरूवारी रात्री पर्यंत या स्वॅब चा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.
एक हजार घरे कंटेनमेंट झोन मध्येराज मोहल्ला परिसर प्रशासनाने सील केला आहे. या भागातील रस्त्यावर बॅरेगेटींग केली आहे. त्यामुळे एक हजार घरे आणि जवळपास ३ हजार नागरिक कंनटमेंट झोन मध्ये आहेत. संपूर्ण परिसर सॅनिटायझर करण्यात आला आहे.तसेच या परिसरातील घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे २० पथके सर्व्हेक्षण करत आहे. दरम्यान, सेलू सह जिल्ह्याचे लक्ष स्वॅबच्या अहवालाकडे लागले आहे.