परभणी : जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या आता २५ झाली आहे.
येथील मोमीनपुरा भागातील ८८ वर्ष वयाची महिलेस कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. २५ जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेस श्वसनाचा त्रास असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात आता कोरोनाचे २५ बळी झाले आहेत.