पाथरी : दिल्ली येथून एकास आयसोलेशन कक्षात ठेवल्यानंतर आता प्रशासनाने कुवेत येथून 6 मार्च रोजी पाथरी येथे आलेल्या चार जणांना होम क्वारंटाईन केले आहे. चारही जण एकाच कुटुंबातील असून 3 एप्रिल रोजी तपासणीकरून प्रशासनाने होम क्वारंटाईन केले.
दिल्ली येथील घटनेनंतर प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी पर्यंत केले जात आहे. लॉकडाउनच्या काळात जिल्हा सीमेवर दाखल झालेले मजुरांचे प्रशासनाने होम क्वारंटाईन करून रोज आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. होम कोरान्टीन केलेल्या मजुरामध्ये पाथरी तालुक्यातील ही काही मजूर आहेत.
कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाल्याचे पहावयास मिळत आहे. 3 एप्रिल रोजी दुपारी दिल्लीहुन आलेल्या एकास पाथरी ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी म्हणून आता 6 मार्च रोजी कुवेत येथून पाथरीत परतलेल्या पती-पत्नी दोन मुले अशा चार जणांची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाईन केले आहे. अशी माहिती तहसीलदार एन यु कागणे यांनी दिली. त्यांची आरोग्य तपासणी नियमित केली जाणार आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुमंत वाघ यांनी दिली.