शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

CoronaVirus : कौतुकास्पद ! सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करत पाथरीत गरीब कुटुंबांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 2:14 PM

12 दिवसात 2480 कुटुंबाला धान्य वाटप केले जाणार

ठळक मुद्देविशेष सर्वेक्षणात निघालेल्या कुटुंबाला धान्य वाटप एका किटमध्ये 15 दिवस पुरेल एवढे धान्य गर्दी टाळण्यासाठी अंतर ठेवून बनविण्यात आले बॉक्स 

- विठ्ठल भिसे 

पाथरी : संचारबंदी च्या काळात गोरगरीब लोकांचे होणारे हाल आणि उपासमार टाळण्यासाठी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी शहरात केलेल्या विशेष सर्वेक्षण मध्ये 2 हजार 480 कुटुंब पुढे आले आहेत. या कुटुंबातील लोकांना 15 दिवस पुरेल इतके धान्य 7 एप्रिल पासून वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. मोठया प्रमाणावर धान्य वाटपाचा कार्यक्रम होत असला तरी सोशल डिस्टनसिंगची काटेकोर अंमलबजावणी करत पहिल्या दिवशी 200 कुटुंबाला किट वाटप करण्यात आल्या आहेत.

पाथरी शहरात सध्या संचारबंदी सुरू आहे शहरात विविध वसाहती वर अनेक गोरगरीब मजूर लोक हाताला काम नाही त्या मूळ अन्न धान्य नसल्याने उपासमारीला सामोरे जात आहेत , शहरातील आशा लोकांचा शोध घेण्यासाठी आठ दिवसात एका संस्थेची मदत घेऊन आमदार बाबाजानी दुराणी यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत सर्वेक्षण केले आहे त्यात गोरगरीब आणि हातावर पोट असणारे 2 हजार 480 कुटुंबा सर्वेक्षनात दिसून आले आहेत या कुटुंबाला दर रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किमान धान्याची किट देण्याचा निर्णय घेतला आमदार दुराणी यांनी स्वतः खर्चातून हे धान्य , 15 दिवस पुरेल एवढे धान्य या किट मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे , 

7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आमदार बाबाजानी यांच्या निवासस्थानासमोर किट वाटप करण्यात आल्या. यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी , तहसीलदार एन यु कागणे, नगर परिषद चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर आणि उपनगराध्यक्ष हनान खान यांची उपस्थिती होती. सोशल डिस्टनसिंग पाळून धान्य वाटपासाठी मोकळ्या जागेत 1 मीटर अंतराचे बॉक्स तयार करण्यात आले होते , गरजू लोकांना त्यांच्या तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधल्या नंतरच त्या ठिकाणी प्रवेश देऊन एक एक करत एक मीटर अंतरावर बसवण्यात आले , नंतर धान्याची एक किट त्यांच्या पर्यंत पोहचविण्यात आली. सोशल डिस्टनसिंगचे पालन करत धान्याचे किट वाटप करण्यात आले. 12 दिवस याच पद्धतीने सोशल डिस्टनसिंग ठेवत धान्य वाटप केले जाणार आहे.

काय आहे किट मध्ये विविध 10 प्रकारच्या किराणा वस्तू देण्यात आल्या आहेत. यात 10 की गव्हाचे पीठ ,10 किलो तांदूळ ,2 की साखर ,2 तेल पुढे ,1 की मसूर डाळ , 250 ग्राम चहा पुडा, मिरची पावडर अंगाची साबण आणि कपड्याची साबण असे साहित्य या किटमध्ये वाटप करण्यात आले आहे.

गरजूपर्यंत छोटीशी मदतदर वर्षी रमजानच्या काळात गोरगरीब लोकांना आवश्यक राशन पुरविण्यात येत असे, या वर्षी कोरोनाचे मोठे संकट आले आहे , गरीब लोकांची उपासमार होऊ नये यासाठी सर्व जमाजातील गरीब लोकांचे सर्वेक्षण करून त्याना दैनंदिन जीवनात लागणारे 15 दिवस पुरेल इतके धान्य किट देऊन छोटीशी मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात आले आहे - आमदार बाबाजानी दुर्रानी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी