परभणी : कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात परभणी जिल्हा राज्यात द्वितीय असून, जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.१ टक्के एवढा आहे.
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत ९६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या चार रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे न आढळल्यास डिस्चार्ज पॉलिसीनुसार त्यांना कोरोनामुक्त म्हणून जाहीर केले जात आहे.परभणी जिल्ह्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट ८७.१ टक्के असून हा जिल्हा राज्यात द्वितीय स्थानावर आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९०.४ टक्के असून हा जिल्हा राज्यात क्रमांक एक वर आहे.
मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा वगळता बीड जिल्हा राज्यात दहाव्या स्थानावर असून, या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ६९.९ टक्के, लातूर जिल्हा आठव्या स्थानावर असून या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ६४.१ टक्के आहे. जालना जिल्हा विसाव्या स्थानावर असून रिकव्हरी रेट ६३.३ टक्के आहे. नांदेड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ६२.१ टक्के असून राज्यात २३ व्या स्थानावर आहे. तर ५५.३ टक्के रिकव्हरी रेट असलेला औरंगाबाद जिल्हा राज्याच्या यादीत २५ व्या स्थानावर आहे.