परभणी : येथील कोरोना बाधित युवकाचा तिसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला असून, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़ मंगळवारी या युवकाच्या इतर अनुषंगिक तपासण्या करून त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला़
१३ एप्रिल रोजी पुणे येथून परभणीत नातेवाईकांकडे आलेल्या एका युवकाचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती़ या युवकास जिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर वैद्यकीय अधिकाºयांनी उपचार केले़ त्याचे नातेवाईक आणि त्यांच्या संपर्कात आलेले इतर नागरिक अशा २८ जणांचे स्वॅब अहवालही निगेटिव्ह आले असून प्रत्यक्ष कोरोनाबाधित युवकाचा तिसरा स्वॅब अहवाल सोमवारी निगेटिव्ह प्राप्त झाला आहे़ त्यामुळे परभणीकरांना दिलासा मिळाला़ मंगळवारी या युवकाची रक्त, लघवी तपासणी करणे, एक्स-रे व इतर तपासण्या करून त्यास जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़