सेलू:- सेलू येथील पारीख काॅलनीतील रहिवासी तथा परभणी येथे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचा-याचा स्वॅब अहवाल शुक्रवारी रात्री पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे पारिख काॅलनी परिसर प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
परभणी येथील जिल्हा विशेष शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यास काही दिवसापासुन ताप, खोकला आदी ञास होत असल्याने त्यांना गुरूवारी परभणी येथील जिल्हा रूग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आला होते. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचा तेथेच स्वॅब घेण्यात आला होता. शुक्रवारी रात्री उशीरा सदरील पोलीस कर्मचा-यास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांच्या सहवासातील व्यक्तीची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. तसेच कुटूंबातील व्यक्तीचेस्वॅब घेतले जाणार आहेत.
आणखी एक बॅक कर्मचारी बाधित
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील आणखी एका कर्मचा-यास कोरोनाची लागन झाल्याचे शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवाल वरून स्पष्ट झाले आहे. या बॅकेतील यापूर्वी चार जण कोरोना पाॅझेटीव्ह आढळून आले आहेत. पारिजात काॅलनीतील रहिवासी असलेल्या बॅक कर्मचारी कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषित करून सील केला जात आहे. तसेच त्यांच्या सहवासातील व्यक्तीची माहिती एकञ केली जात असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी दिली.