शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

coronavirus : रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये परभणी जिल्ह्यात आढळले १८१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 4:36 PM

अँटीजन कीटद्वारे तपासणीमुळे रुग्णांची संख्या झटपट निष्पन्न

ठळक मुद्देजिल्ह्यातील ग्रामीण भागात पसरला संसर्ग 

परभणी : जिल्ह्यात रॅपिड टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे़ सोमवारी जिल्हाभरात झालेल्या ठिक ठिकाणच्या तपासण्यांमध्ये एकूण १८१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत़ परभणी शहरात महानगरपालिकेने १४ केंद्रांवर १ हजार ३२५ व्यापाऱ्यांची रॅपिड टेस्ट केली़ त्यामध्ये ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ 

पाथरी शहरात ३०१ जणांच्या टेस्ट घेतल्या असून, त्यात ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नगरपालिकेच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़ पालम  शहरासह दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या रॅपिड तपासणीत  ६ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत़ त्यांना पेठशिवणी येथील कोविड सेंटर येथे दाखल केले आहे़ लोहा रस्त्यावरील आश्रम शाळेत ५० जणांपैकी दोघे आणि चाटोरी येथील आरोग्य केंद्रात ५० पैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़

गंगाखेड शहरात ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यातील ५ जण ग्रामीण भागातील  आहेत़ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने शहरातील ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले़ तालुक्यात आता बाधित रुग्णांची संख्या २६७ पेक्षाही अधिक झाली आहे़ पूर्णा शहरात दिवसभरात ११० जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात ६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत़ धानोरा काळे येथेही २२ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ 

ग्रामीण भागात एकाच दिवशी १०० रुग्ण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सोमवारपासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू केल्या आहेत़ सोमवारी दिवसभरात १०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत़ जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी रॅपिड टेस्ट केली जात आहे़ परभणी तालुक्यात १४२ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ गंगाखेड तालुक्यात १२७ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़ पाथरी तालुक्यात ६७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली़ त्यात ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले़ सेलू तालुक्यात १६९ पैकी १, मानवत    तालुक्यात ६२ पैकी १, जिंतूर तालुक्यात १०९ पैकी २, पूर्णा तालुक्यात २६६ पैकी ३७, सोनपेठ तालुक्यात २३ पैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत तर पालम तालुक्यामध्ये ३० जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली़ त्यात एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही़ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवारी दिवसभरात १ हजार ६०५ तपासण्या करण्यात आल्या़ त्यात १०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातही विळखा वाढत आहे़

जिंतूरमध्ये ६ व्यापारी पॉझिटिव्हशहरात व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट केल्या जात आहेत़ सोमवारी ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ १५ आॅगस्टपासून रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली़  पहिल्या दिवशी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ २० व्यापारी पॉझिटिव्ह आढळले़ १७ आॅगस्ट रोजी आरोग्य विभागाने ५८ जणांची रॅपिड टेस्ट केली़ त्यात ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ शहरात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ होत आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी