परभणी : जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला बाजार व इतर खाद्यपदार्थांची दुकाने १० मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी काळात नागरिकांच्या सुविधेसाठी १ ते ४ मे दरम्यान किराणा दुकाने आणि भाजीपाला बाजार सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. या संदर्भाने मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील किराणा साहित्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची दुकाने ४ ते १० मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा व साहाय्यभूत सेवांना या आदेशावरून वगळण्यात आले आहे.