बामणी (परभणी) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी सकाळी ९़३० वाजण्याच्या सुमारास करंजी फाट्यावर घडली़
रवि सातपुते आणि बाबु गिरे हे दोघे एमएच २२ - ०६२५ या दुचाकीने करंजी येथून बामणीकडे येत होते़ त्याचवेळी सिद्धार्थ नामदेव अंभोरे, विकास शिवाजी भिटेकर (दोघे रा़ कोलसुला, ता़जिंतूर) आणि मिलिंद बबन दुजाकर हे तिघे एमएच २२ - एएफ-८१४५ या दुचाकीने जिंतूरकडे जात होेते़ करंजी फाट्यावर या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली़ अपघातग्रस्तांना तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले़ तेव्हा डॉक्टरांनी रवि पंजाबराव सातपुते (२५, रा़ कोलपा ) यास मृत घोषित केले़ इतर चोघे जखमी झाले आहेत़ त्यापैकी मिलिंद दुजाकर आणि विकास भिटेकर या दोघांची प्रकृती चिंताजन असून त्यांना परभणीतील शासकीय रूग्णालयात हलविले आहे़ दुपारपर्यंत घटनेचा पंचनामा झाला नव्हता़
लॉकडाऊनमध्येही वाहतूक सुरूदेशभरात लॉकडाऊन घोषित केले असून बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेकपोस्ट नसल्याने जिंतूर-बामणी रस्त्यावर वाहनांची वर्दळ नेहमीच पहावयास मिळत आहे़ ही वाहने भरदाव वेगाने धावत असतात़ त्यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत़ बुधवारी झालेल्या अपघाताची माहिती पोलिसांना देऊनही पोलीस वेळेत घटनास्थळी दाखल झाले नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने जखमींना दवाखान्यात दाखल केले़