परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत साखला प्लॉट भागात मटका घेणाऱ्या एका आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली. आरोपीकडून १ हजार ४४० रुपये आणि एक मोबाईल असा १३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथेही मटका घेणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध कारवाई करीत ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गंगाखेड तालुक्यातील झिरोफाटा येथे मटका खेळणार्या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून २ हजार ४४० रुपये जप्त केले आहेत. पूर्णा शहरातही मटका घेणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूण पाच कारवायांमध्ये ७ हजार २८० रुपये रोख जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे गंगाखेड शहरात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या एका आरोपी विरुद्ध कारवाई करीत त्याच्याकडून २ हजार ४९६ रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.
मटका खेळणाऱ्या सात जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:24 AM