परभणी : विकलेल्या भंगारची रजिस्टरवर नोंद न घेतल्याने सेलू शहरातील तीन भंगार विक्रेत्यांविरुद्ध एटीएसने गुन्हे दाखल केले आहेत.
येथील दहशतवाद विरोधी पथकातील (ए टी एस) अधिकाऱ्यांनी ३ डिसेंबर रोजी सेलू शहरात तपासणी केली. तेंव्हा भंगार चालक शेख अन्वर अत्तार (अवेस स्क्रप मर्चंट), शेख शकील अत्तार (के. जी.एन. स्क्रॅप सेंटर) आणि शेख गौस शेख गुलजार (स्टार स्क्रॅप सेंटर) यांनी खरेदी विक्री केलेल्या भंगार मालाची रजिस्टरवर नोंद घेतली नाही. तसेच आधार क्रमांकही घेतले नसल्याचे दिसून आले. भंगार विक्रेत्यांना दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने तिघांविरुद्धही सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विश्वास खोले यांच्या मार्गदर्शनाखाली भारत नलावडे, दत्तात्रय चिंचाणे, सुधीर काळे यांनी केली.