लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत; परंतु, अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत़ यासाठी महिलांनीच अन्याय, अत्याचार सहन न करता लढा देऊन सक्षम बनावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे यांनी केले़मानवत येथील माहेश्वरी सभागृहामध्ये ११ मार्च रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले़ या प्रसंगी वागळे बोलत होत्या़ कार्यक्रमास डॉ़ मनीषा गुजराथी, उज्ज्वला मोरे, नगरसेवक स्वाती कत्रुवार, दीपाली दिनकर, पूनम पवार, मोहिनी दगडू, अनुजा कडतन आदींची उपस्थिती होती़ यावेळी शहरातील जुने दत्त मंदिर महिला मंडळ, आर्यवैश्य महिला मंडळ, कुलस्वामिनी महिला मंडळ, क्षेत्रीय महिला मंडळ, पेशवा महिला संघटना, विदर्भ कन्या मंडळ, वीरशैव महिला मंडळ, पद्मशाली महिला मंडळ, दिव्याधाम महिला मंडळ अशा १७ मंडळातील सदस्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सामाजिक प्रबोधनपर नाटिकाही सादर करण्यात आल्या़ डॉ़ शरयू खेकाळे यांनी प्रास्ताविक केले़ राणी पारसकर यांनी सूत्रसंचालन केले़ जयश्री तोडकरी यांनी आभार मानले़ यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.
मानवत (परभणी)येथे सांस्कृतिक कार्यक्रम :महिलांनी अन्याय, अत्याचाराविरोधात लढा द्यावा- रेणुका वागळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:45 AM