गंगाखेड तालुक्यातील खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला.रब्बी हंगामातील नगदी पिक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गहु, ज्वारीची पिके दाने भरण्याच्या अवस्थेत असतानाच अवकाळी पाऊसने या पिकांचे नुकसान झाले आहे.यात गंगाखेड महसुल मंडळात १ हजार ६२० हेक्टरवरील ज्वारी, ४१४ हेक्टरवरील गहु, महातपुरी मंडळात २ हजार ५९८ हेक्टर ज्वारी, ६१९ हेक्टर गहु, माखणी मंडळात ३ हजार हेक्टर ज्वारी, ८५२ हेक्टर गहु ,राणीसावरगाव मंडळात २ हजार ८७ हेक्टर ज्वारी, २१६ हेक्टर गहु, पिंपळदरी मंडळात २ हजार २४० हेक्टर ज्वारी, ८२६ हेक्टरवरील गहु अवकाळी पाऊस पडल्याने शेतातील हे पिक आडवे पडले आहे. दाने भरण्याच्या अवस्थेत असलेले हे पिक आडवे पडल्याने उत्पादनात मोठी घट निर्माण होणार असुन कापणीचा खर्च निघणे मुश्किल झाले आहे. गहु आणी ज्वारी असे १४ हजार ६३८ हेक्टरवरी पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतांना सुध्दा महसूल प्रशासनाने अजुनही नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात करण्यात आली नाही.
अवकाळी पाऊसाने १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:25 AM