सोनपेठ: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दशरथ सूर्यवंशी तर उपसभापती पदी उत्तम जाधव यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी शिवाजी गीनगिने यांनी याबाबत घोषणा केली.
सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 18 पैकी 18 जागेवर एकतर्फी विजय मिळवला होता. आज सभापती-उपसभापती पदाच्या निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पिठासिन अधिकारी एस. व्ही. गिनगिने यांच्याअध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा बोलवण्यात आली होती. यावेळी सभापती पदासाठी दशरथ सुर्यवंशी व उपसभापती पदासाठी उत्तम जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक प्राधिकृत अधिकारी यांनी घोषित केले.
यानंतर मा. जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, विठ्ठलराव सुर्यवंशी, लक्ष्मीकांत देशमुख, दिगंबर भाडूळे, मदनराव विटेकर, श्रीराम भंडारे, रंगनाथ रोडे, ॲड. श्रीकांत विटेकर, राजेभाऊ सावंत, मदन सपकाळ, आशोकराव यादव, बालाजी जोगदंड, शिवाजीराव भोसले, तुकाराम भालेकर, श्रीराम वांकर, आदींनी त्यांचे स्वागत केले. या वेळी निवडणुक प्रक्रियेमध्ये कृ उ बा समितीचे सचिव अशोक भोसले, दत्ताञय भोसले, हरून सय्यद, बळीराम भोसले, भाऊराव कुरूडे, गणेश घुले, महेश पेकम आदींनी सहकार्य केले.