परभणी : टाटा सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात सहा वर्षीय बालिका ठार झाली. तर एका बालकासह महिला जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास पूर्णा येथील जि.प. शाळेच्या मैदानावर घडली. हिंगोलीतील फुलेनगर परिसरात राहणाऱ्या मीना बंडू थोरात, त्यांचा मुलगा करण थोरात (वय ७) व भावाची मुलगी अर्चना रामा गायकवाड (वय ६) हे तिघेजण ७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या सुमारास गावात काम करणाऱ्या भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी जात होते. त्यांना एम.एच.२३-ई-२९७८ या क्रमांकाच्या जीपने धडक दिली. यात सहा वर्षीय अर्चना रामा गायकवाड या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर मीना थोरात व करण थोरात हे दोघे जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)
जीपच्या धडकेत बालिकेचा मृत्यू
By admin | Published: January 09, 2017 4:17 AM