शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

४० फूट पुलाखाली आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; दैठणा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 2:18 PM

तपास सुरु.

लक्ष्मण कच्छवे, दैठणा (जि.परभणी) : परभणी तालुक्यातील दैठणा जवळील गंगाखेड-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या ४० फूट खोल पुलाखाली शनिवारी सायंकाळी ६ च्या सूमारास कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याचे समजले. क्रेनच्या सहाय्याने हा मृतदेह बाहेर रविवारी दुपारी १२ च्या सुमारास काढण्यात आला.  पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे समोर आले. मात्र, अद्याप त्याची  ओळख पटलेली नाही.  

याबाबत माहिती अशी, सदरील पुलाखाली हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे काही नागरिकांना हे लक्षात आल्यावर त्यांनी गावच्या पोलीस पाटील राजश्री चव्हाण यांना कळविले. त्यांनी दैठणा पोलीसांना माहिती दिली. यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.आर.बंदखडके, सपोनी.संजय वळसे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. इंद्रायणी नदीच्या पुलाची उंची ४० फूट असल्यामुळे व नदीत पाणी, काटे कुपाटे असल्याने मृतदेह काढण्यास अडचण येत होती. त्यातच सायंकाळ झाल्यामुळे अंधारात काढण्यासाठी अडचणी आल्यामुळे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी मृतदेह क्रेनच्या सहायाने बाहेर काढण्यात आला.

या मृतदेहाच्या उजव्या हातावर मुंजा एकनाथ कटारे असे गोंदलेले नाव आहे तर बाजूला एक ओम गोंदलेला आहे. हा मृतदेह दोन-चार दिवसापासून पाण्यामध्ये असल्यामुळे एकदम सडलेल्या अवस्थेत असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. हे ठिकाण दैठणा गावापासून एक किमी अंतर असून रात्रीच्या वेळी सुनसान इलाका आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी रविवारी दूपारी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र शिरतोडे, सपोनि बी.आर.बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे उपस्थित होते. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. घटनेची नोंद दैठणा ठाण्यात करण्याचे काम सुरु होते. या ठिकाणी श्वान पथकाला सुध्दा पाचारण करण्यात आले होते.

टॅग्स :Accidentअपघात