पाणी पातळी खालावली
परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. पाणी पातळी खोल गेल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यासाठी झाडे तोडली
परभणी : येथील गंगाखेड रोड भागात रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा रस्ता उजाड दिसत आहे. कंत्राटदारास नवीन झाडे लावण्याचे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे.
रस्ता उखडला
परभणी : येथील नवा मोंढा भागतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जागोजागी उखडल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शिवाय धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रवाशांची गैरसोय
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर एकच आरक्षण तिकिट खिडकी सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. परभणी स्थानकावरुन रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रांगेत उभे राहून तिकिट काढावे लागत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता आणखी एक तिकिट खिडकी वाढवावी, अशी मागणी होत आहे.