लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खाते स्टेट बँक आॅफ इंडियाकडे वर्ग झाले असले तरी ४२ कोटी रुपयांचा निधी इंडिया बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करीत असल्यावरून जि.प.च्या पदाधिकाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.या संदर्भात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची मंगळवारी जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, राष्ट्रवादीचे गटनेते अजय चौधरी, सभापती अशोक काकडे, प्रसाद बुधवंत, पंकज आंबेगावकर, विश्वनाथ राठोड आदींनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जिल्हा बँकेत असलेल्या रक्कमेसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जि.प. व ९ पंचायत समित्यांचे जिल्हा बँकेतील खाते यापूर्वीच भारतीय स्टेट बँकेत वर्ग करण्यात आले आहे. परंतु, जिल्हा बँकेने सर्व रक्कम भारतीय स्टेट बँकेत वर्ग केली नाही.४२ कोटी ४५ लाख रुपयांची ही रक्कम अद्यापही जिल्हा बँकेकडेच आहे. याबाबत जि.प., पं.स.ना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षातील हा निधी असून २०१७-१८ मध्ये खर्च होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा निधी तातडीने भारतीय स्टेट बँकेत जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या खात्यावर वर्ग करण्यासंदर्भात आदेश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकाºयांनी जिल्हा बँकेच्या अधिकाºयांशी संवाद साधला. परंतु, त्यावर तोडगा निघाला नाही.
परभणी जिल्हा परिषदेचा निधी वर्ग करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:21 AM