शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाहीचा निर्धार; सर्वच ३४ उमेदवारांनी घेतली माघार

By राजन मगरुळकर | Published: October 25, 2023 7:01 PM

पूर्णा तालुक्यातील वझूर ग्रा.प.साठी ३४ जणांनी घेतले अर्ज माघारी, पूर्णा तालुक्यातील वझूर ग्रा.प.साठी ३४ जणांनी घेतले अर्ज माघारी

- गजानन नाईकवाडेवझुर, ताडकळस (जि.परभणी) : मराठा आरक्षणासंदर्भात पूर्णा तालुक्यातील वझुरच्या ग्रामस्थांनी आक्रमक होत थेट होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यामध्ये ग्रा.प.च्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच्या सर्व ३४ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. सोबतच मराठा समाजाला आरक्षण नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निर्धार केला.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायत पाच जानेवारीपासून प्रशासक कार्यकाळ लागू करण्यात आला आहे. मागील आठ महिन्यापासून येथे प्रशासकीय कारभार सुरु होता. मागील काही दिवसापासून येथील निवडणूक प्रक्रिया चालू होती. त्यात २५ ऑक्टोबरला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ग्रामस्थांनी दोन पॅनलचे व अपक्ष अर्ज मिळून एकुण सदस्य पदासाठी ३१ अर्ज आले होते तर सरपंच पदासाठी तीन अर्ज आले होते. बुधवारी हे सर्व अर्ज माघार घेऊन ग्रामस्थांनी आरक्षण नाही तर निवडणूक नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. पूर्णा तालुक्यातील वझुर हे गोदावरी नदीकाठी वसलेले चार हजार मतदान असलेले गाव आहे. अकरा सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे.

सरपंचपद राखीव प्रवर्गासाठी तरीही माघारवझुर येथे यावेळेसचे सरपंचपद हे राखीव प्रवर्गासाठी असले तरी आरक्षणाअभावी मराठा समाजावर अन्याय होत असल्यामुळे मराठा समाजासह इतर प्रवर्गातील उमेदवारांनी सोमवारी वझुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी मिळून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

पुढील निर्णय घेऊनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या ३४ जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने या निवडणुकीची पुढील प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. ही प्रक्रिया आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवत असून पुढील प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात येईल.- वसंत विखे, वझूर ग्रा.पं.निर्वाचन अधिकारी.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकparabhaniपरभणी