जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीस असलेले नारायण किशनराव जोगदंड हे पेडगाव रोड भागातील लक्ष्मीनगर भागात राहतात. १० मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ते भावाच्या घरून बाहेर येत असताना एमएच २२ एए ०६०५ क्रमांकाचा एक हायवा टिप्पर मुरुम टाकत होता. यावेळी टिप्पर चालकाने त्याचे वाहन पाठीमागे घेत असताना भरघाव वेगाने चालवून जोगदंड यांना जोराची धडक दिली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मणक्यालाही गंभीर मार लागला. उपचारार्थ त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार घेताना ते एक महिना बेशुद्ध होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातामुळे त्यांना अपंगत्व आले. याबाबत नारायण जोगदंड यांनी २० जुलै रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एमएच २२ एए ०६०५ क्रमांकाच्या हायवा टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्परच्या धडकेने एकास अपंगत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:13 AM