आजचा मोबाइल म्हणजे आपले बँक खाते आहे. पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी जशी बँकेची माहिती घेऊन खाते काढले जाते, तसेच मोबाइलमधील माहितीसुद्धा सांभाळून ठेवणे गरजेचे आहे; अन्यथा फसवणूक करणाऱ्यांच्या हातातून आपल्या मोबाइलमधील बँक खाते साफ केले जाऊ शकते. आधार आणि कोणत्याही व्यवहाराला पूर्ण करण्यासाठी दरवेळी मोबाइलवर एक ओटीपी येतो. हा ओटीपी चुकीच्या माणसाच्या हातात एका काॅलसाठी तुम्ही दिल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक-
कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन
वेगळी लिंक पाठवून
लॉटरी लागली आहे असे सांगून
केवायसीसाठी आवश्यक आहे, असे सांगून
ज्येष्ठ नागरिकांची होऊ शकते फसवणूक
अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध असतात. मात्र, त्यांना या मोबाइलमधील वेगवेगळे ॲप कसे वापरावेत, याची माहिती त्यांना नसते. अशा वेळी काही चोरट्यांकडून त्यांना लक्ष केले जाते. त्यांच्या खात्यातील पैसे मोबाइलमधून कसे काढता येतील, यासाठी चोरटे प्रयत्नशील असतात. परभणीत काही ज्येष्ठ नागरिकांचे पैसे गायब झाले आहेत.
ही घ्या काळजी
मोबाइलला कायमस्वरूपी पासवर्ड दिलेला असावा. सार्वजनिक ठिकाणांवरील वायफायचा वापर करू नये. आपला डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाइलची अँड्रॉइड सिस्टम नेहमी अपडेट असावी. आधार कार्डचा ओटीपी कोणालाही सांगू नये, तसेच आधार कार्डची प्रत कोणालाही देऊ नये आणि आधार नंबर कोणालाही सांगू नये.