म्हणून चायनिस खाणे टाळा
चांगला वास आणि चमचमीतपणा यामुळे चायनिसचे पदार्थ खाण्यास अनेकांची पसंती असते. मात्र, हे पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया मंद होते. फूड अँन्ड ड्रग्स विभागाची वेगवेगळ्या फ्लेवरच्या पदार्थांचा वापर करण्यास परवानगी असली तरी त्याचा काही ठिकाणी अति वापर केला जातो. यामुळे अजीर्ण, अपचण, प्रजनन क्षमता खराब होऊ शकते.
लहान मुलांमध्ये वजन वाढीचा धोका
चायनिस पदार्थ तसेच फास्टफूड खाल्याने लहान मुलांमध्ये वजन वाढीचा धोका वाढला आहे. यातच सध्या शाळा बंद असल्याने शारिरीक श्रम नाहीत. त्यात व्यायाम आणि खेळ यांच्याएवजी ऑनलाईन शिक्षणात वेळ जात आहे. यातच बाहेरील हे खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांमध्ये हा धोका असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.
डाँक्टर म्हणतात...
अति प्रमाणात किंवा नेहमी चायनिस व फास्टफूड खाल्याने वजन वाढणे, पोटाचे आणि मेंदूचे विकार जडू शकतात. यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे. यात प्रत्येकाने सकस आहार घ्यावा. कधीतरी बदल म्हणून हे पदार्थ खावेत. मोनो सोडियम ग्लुटोमीटचा वापर केल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. - डाँक्टर महेश कोरडे, पोट विकार तज्ञ.