जिल्ह्यात एक शासकीय आणि दोन खासगी अशी तीन पॉलिटेक्निक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तीनही महाविद्यालयांतील जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे अर्ज अधिक आहेत. मागील दोन वर्षांपासून पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यावर्षीदेखील तीच परिस्थिती आहे.
संगणक, सिव्हिलला पसंती
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा संगणक आणि सिव्हिल या शाखांकडे अधिक आहे. कंपन्यांमध्ये संगणक शाखेला महत्त्व वाढले आहे. त्यामुळे ही शाखा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीही लगेच मिळते. त्यामुळे दोन वर्षांपासून कॉम्प्युटर तसेच सिव्हिल, मेकॅनिकल या शाखांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. जिल्ह्यात तीन महाविद्यालये
जिल्ह्यात जिंतूर येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आहे. या ठिकाणी १८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, परभणी आणि सेलू यथे खासगी पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. या सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रमाण अधिक आहे.
पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्याचप्रमाणे आम्हीदेखील त्यासाठी प्रयत्न केले. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांशी व्यक्तीश: संपर्क साधला. त्यांचे समुपदेशन केले आहे. पी. व्ही. नंदनवार, प्रभारी प्राचार्य
जिल्ह्यातील प्रवेश क्षमता
एकूण पॉलिटेक्निक महाविद्यालये
३
एकूण प्रवेश क्षमता ५८०
प्रवेश अर्ज ५४७
पाॅलिटेक्निक महाविद्यालये
शासकीय १
खासगी २
महाविद्यालयाची प्रवेश क्षमता
शासकीय १८०
खासगी : ४००