लग्नासाठी हुंडा घेतला किंवा दिल्यास पदवी रद्द करण्याचा निर्णय केरळमधील विद्यापीठाने घेतला आहे. याबाबत असा निर्णय राज्यात झाला नसला तरी प्रत्यक्षात हुंडा घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुलांचे शिक्षण, नोकरी तसेच पुढील आयुष्यासाठी मुलांचे आई-वडील लग्न ठरविताना हुंड्याची अट घालतात. यामुळे मुलांची अपेक्षा असली नसली तरीही मुलीच्या वडिलांकडून रितसर थाटामाटात लग्न करून हुंडा घेतला जातो. यात काही ठिकाणी हुंडा न घेता साधेपणाने लग्न पार पाडले जातात. परंतु जे हूंडा देऊ शकत नाहीत किंवा ज्यांनी हूंडा व अन्य हौस-मौज पूर्ण केली नाही, अशा मुलींना विवाहानंतर सासरी त्रास देऊन हुंड्यासाठी छळ केला जात असल्याच्या अनेक घटना सध्या घडत आहेत.
हुंडाविरोधी कायदा नावालाच
हुंडा घेऊ नये तसेच तो देऊ नये याविषयी कायदा असला तरी याचा विसर मुला-मुलीच्या आई-वडिलांना पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे शक्यतो काही जणच त्याचे पालन करतात. उर्वरित अनेक पालकांना व मुलांना त्याचा विसर पडतो.
जिल्ह्यात हूंड्यासाठी छळाच्या तक्रारी
जानेवारी ते डिसेंबर २०२० - ७०७
जानेवारी ते जून २०२१ - ३६४
मुलांच्या मनात काय ?
लग्न करताना केवळ मुलीचे शिक्षण व स्वभाव पाहणे गरजेचे आहे. मात्र, आता देण्या-घेण्याच्या किरकोळ बाबी समोर करुन लग्न मोडले जाते. हे चुकीचे आहे. - उपवर.
ग्रामीण भागात पैसा हूंडा म्हणून मागितला जातो. यात अनेक मुलींच्या वडिलांची परिस्थिती नसतानाही लग्न आणि हूंडा देण्याचा घाट घातला जातो. - उपवर.
मुलींच्या मनात काय ?
केवळ लग्न करताना हूंड्यामुळे पुढील बोलणी टाळल्या जातात. यात मुलीच्या काय अपेक्षा आहेत, याचा विचार ना मुलगा करतो ना त्याच्या घरातील सदस्य. यामुळे लग्नानंतर त्रास मुलीला सहन करावा लागतो. - उपवधू
मुलाचे शिक्षण कमी असले तरी आणि नोकरीतील पगार जेमतेम असतानाही लग्न थाटामाटात करुन द्या, असा आग्रह घरला जातो. तसेच हूंडा घेतला जातो. याला विरोध करणे गरजेचे आहे. - उपवधू.