सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नांदेड-अमृतसर सचखंड
नांदेड-बेंगलोर एक्स्प्रेस
ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस
आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस
हैदराबाद-औरंगाबाद एक्स्प्रेस
नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस
सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस
पॅसेंजर कधी सुरू होणार ?
सध्या तरी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय रेल्वे बोर्डाने घेतलेला नाही. देशातील काही महत्त्वाच्या स्थानकादरम्यान लोकल सेवा, डेमो रेल्वे सुरू झाल्या आहेत. मात्र, मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे सध्या परभणी स्थानकावरून कोरोनापूर्वी ये-जा करणाऱ्या जवळपास २० ते २४ रेल्वे बंद आहेत. या रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.
या रेल्वे कधी सुरू होणार?
परभणी-नांदेड-तांडूर
अमरावती-पुणे
इतर राज्यात जाण्यासाठी कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र रेल्वे प्रवासासाठी आवश्यक आहे. या प्रमाणपत्राची तपासणी इतर राज्यात स्थानकावर उतरल्यावर तेथील स्थानिक प्रशासन करते. याचप्रमाणे आपल्या स्थानकात परराज्यातून आलेल्या प्रवाशांची टिकीट, कोरोना टेस्ट केली जाते.
- अरविंद इंगोले, स्टेशन प्रबंधक, परभणी
मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण मिळेना
सध्या परभणी येथून मुंबईत जाण्यासाठी दिवसभरात ५ रेल्वे सुरू आहेत. यामध्ये तपोवन, राज्यराणी, देवगिरी, नंदिग्राम व पनवेल या रेल्वेंचा समावेश आहे. मात्र, यातील तपोवन आणि पनवेल बगळता बहुतांश रेल्वेचे आरक्षण किमान १० दिवस आधी काढणे गरजेचे आहे. सध्या या सर्व रेल्वेचे आरक्षण पुढील ७ ते ८ दिवस उपलब्ध नाही. यामुळे एवढ्या रेल्वे असूनही अनेक प्रवाशांना आरक्षण मिळत नसल्याने मनमाडपर्यंत जावे लागत आहे. तेथून दुसऱ्या रेल्वेने मुंबई गाठण्याची वेळ अनेकांवर येत आहे.
कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
इतर राज्यात जाण्यासाठी कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र रेल्वे प्रवासासाठी आवश्यक आहे. या प्रमाणपत्राची तपासणी इतर राज्यात स्थानकावर उतरल्यावर तेथील स्थानिक प्रशासन करते. याचप्रमाणे आपल्या स्थानकात परराज्यातून आलेल्या प्रवाशांची टिकीट, कोरोना टेस्ट केली जाते. तसेच इतर राज्यात जाण्यासाठी लसीकरण करणेही गरजेचे आहे. हे प्रमाणपत्रसुध्दा काही राज्यांमध्ये मागितले जाते. मात्र, केवळ महाराष्ट्रात जाण्यासाठी काही टेस्टची आवश्यकता नसल्याचे समजते.