वाहन चालकाने दारू पिऊन वाहन चालवू नये, यासाठी पोलीस प्रशासन ड्रंक आणि ड्राइव्हच्या कारवाया करीत असते. वाहतूक शाखा आणि जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या कारवाया केल्या जातात. मागील दोन वर्षांत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवरील कारवायांमध्ये मोठी घट झाली आहे. वाहतूक शाखेने ट्रिपल सीट वाहन चालविणे, फॅन्सी नंबर, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे आदी कारवाया करून दंड वसूल केला असला तरी ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाया घटल्याने दारू पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे.
इतर कारवायांमध्ये वाढ
ब्रेक ॲनालायझरचा वापर होत नसला तरी मोटार वाहतूक वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मात्र कारवाई केली जात आहे. कोरोना संसर्ग काळात पोलिसांनी जिल्हाभरात या कारवाया करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला, तसेच काही वाहनेही जप्त केली आहेत.
ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी ब्रिथ ॲनालायझर वाहनधारकांच्या तोंडात टाकून तपासणी करावी लागते.
या तपासणीत वाहनधारकाने मद्यप्राशन केले आहे किंवा नाही? हे स्पष्ट होते. तपासणीत मद्य प्राशन केल्याचे पुढे आले, तर संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाते.
दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. या संसर्गकाळात ब्रिथ ॲनालायझरचा वापर करणे धोकादायक ठरत असल्याने तो बंद करण्यात आला.
ब्रिथ ॲनालायझरच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, ही बाब लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तपासणी बंद केली आहे.
२०२० मध्ये केलेल्या कारवाया
२०,७७९
२०२० मध्ये वसूल केलेला दंड
५३,२४,८५०