लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (जि. परभणी) : थकीत कर्जासंदर्भात दोन बँकांनी पाठविलेल्या नोटिसांमुळेच तणावाखाली आलेल्या बाबूलतार येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याचा आरोप मंगळवारी नातेवाइकांनी केला. या शेतकºयाने सोमवारी विषप्राशन करून मृत्यूला कवटाळले.जोगदंड यांनी भारतीय स्टेट बँक, वैद्यनाथ बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले होते. जोगदंड यांना यापैकी दोन बँकांनी दिलेल्या नोटिसा मंगळवारी ‘लोकमत’च्या हाती लागल्या. जोगदंड यांनी वैद्यनाथ को.आॅप. बँकेच्या पाथरी शाखेतून ७२ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. या कर्जाच्या संदर्भात ९ मार्च रोजी त्यांना बँकेने नोटीस पाठविली. त्यानंतर २९ मार्च रोजी स्टेट बँकेनेही त्यांना नोटीस पाठविली. एकाच महिन्यात आलेल्या या दोन नोटिसांमुळे जोगदंड हे मानसिकदृष्ट्या खचले. गेल्या महिन्यात राज्य शासनाकडून शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा झाली. परंतु, अटींमुळे आपणाला कर्जमाफी मिळेल की नाही, याचीही चिंता त्यांना सतावत होती. या सर्व नैराश्यातून त्यांनी सोमवारी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.या संदर्भात वैद्यनाथ अर्बन को.आॅप. बँकेच्या पाथरी शाखेतील व्यवस्थापक एस.आर.स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, जोगदड यांना बँकेने नोटीस दिली होती. गतवर्षी पीक परिस्थिती चांगली असल्याने जुने कर्ज भरा, बँक तुम्हाला नवीन कर्ज देईल, अशी विनंती त्यांना केली होती. मार्चनंतर त्यांना बँकेने कोणतीही नोटीस दिलेली नाही, असे ते म्हणाले.
बँकांच्या नोटिसांमुळेच ‘त्या’ने मृत्यूला कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 4:51 AM