शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

डिजिटल तिकिटांमुळे एसटी महामंडळाला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 4:22 AM

छापील तिकीटे बंद करुन डिजिटल तिकिटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजिटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी दर महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्यभरात यावर खर्च कोट्यवधींचा खर्च होत आहे.

 परभणी - छापील तिकीटे बंद करुन डिजिटल तिकिटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजिटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी दर महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्यभरात यावर खर्च कोट्यवधींचा खर्च होत आहे.महामंडळाच्या उत्पन्नातून महिन्याकाठी ही रक्कम दिली जात आहे. ही तिकीटे विभागनिहाय आणि त्यानंतर वाहकनिहाय वितरित केली जात होती आणि विक्री झालेल्या तिकिटांवरुन महामंडळाच्या उत्पन्नाचा लेखाजोखा सांभाळला जात होता. खर्च टाळण्याच्या उद्देशाने २०११ मध्ये छापील तिकीटे बंद करण्यात आली. मात्र डिजिटल तिकीटे देण्यासाठीची यंत्रणा महामंडळाकडे नव्हती. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर २०११ मध्ये ट्रायमॅक्स कंपनीसोबत करार झाला. करण्यात आला. प्रति तिकीट ३८ पैसे कंपनीला मशीन भाडे म्हणून देण्याचे निश्चित झाले. करार संपल्यानंतर महामंडळाने स्वत: मशीन खरेदी करुन तिकीटे देणे अपेक्षित होते. मात्र तब्बल ७ वर्षांपासून या संदर्भात निर्णय झालेला नाही, अजूनही भाड्याच्या मशीनवरच डिजिटल तिकिटे दिली जात आहेत. परभणी विभाग नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यातील ४ आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ आगारांचा समावेश आहे. सातही आगारांमधून दररोज सुमारे ७२ हजार तिकीटे विक्री होतात. त्यावर दररोज २७ हजार ३६० रुपये आणि महिन्यासाठी ८ लाख २० हजार ८०० रूपये कंपनीला भाड्यापोटी दिले जात आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार