शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

परभणी जिल्हा कचेरीतील ई-आॅफीस २२ दिवसांनी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:09 AM

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तब्बल २२ दिवसानंतर शनिवारी ई- आॅफीस प्रणाली पूर्ववत सुरु झाली; परंतु, मध्यंतरीच्या २२ दिवसांच्या काळात ही प्रक्रिया ठप्प झाल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तब्बल २२ दिवसानंतर शनिवारी ई- आॅफीस प्रणाली पूर्ववत सुरु झाली; परंतु, मध्यंतरीच्या २२ दिवसांच्या काळात ही प्रक्रिया ठप्प झाल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागली.कामात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्याच्या उद्देशाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथमच सहा महिन्यांपूर्वी ई-आॅफीस ही प्रणाली सुरु करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आॅनलाईन सर्व्हरवर आधारलेली ही प्रक्रिया असून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्यात प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस झाले. या कार्यालयात येणाºया प्रत्येक कागदाचे स्कॅनिंग करुन आॅनलाईन पद्धतीनेच त्यावर निर्णय घेण्यात आले. अतिशय परिणामकारक असलेली ही पद्धती सुरु झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजालाही गती मिळाली. ई-आॅफीस या प्रणालीअंतर्गत सर्व कामकाज आॅनलाईन करण्यात आले.विशेष म्हणजे एखाद्या फाईलची सुरुवात ते फाईलीवरील निर्णयापर्यंतचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन होत असल्याने ही फाईल नेमकी कुठे ठेवली आहे, त्यामधील काही अडचणी या बाबी एका क्लीकवर निदर्शनास येऊन त्यावर निर्णय घेणे सोपे झाले. सहा महिन्यांपासून कार्यरत असलेली ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता अवगत झाली होती. कामकाजही सुरळीत चालले होते.२२ दिवसांपूर्वी मंत्रालयस्तरावर या प्रक्रियेच्या सर्व्हरमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात वापरली जाणाारी ई-आॅफीस ही प्रक्रिया ठप्प पडली. मागील २२ दिवसांपासून ई-आॅफीसमध्ये कामकाज करताना अडचणी येत असल्याने अधिकारी- कर्मचारी त्रस्त होते. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच एनआयसीच्या अधिकाºयांनी मुंबई येथे सातत्याने पाठपुरावा सुरु केला. मात्र मंत्रालयस्तरावरच या प्रणालीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. मंत्रालयातील तांत्रिक अधिकाºयांची टीम सातत्याने सर्व्हर दुरुस्तीचे काम करत आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे एक-दोन दिवसांत ही यंत्रणा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा होती.जिल्हाधिकारी कार्यालयात वापरल्या जाणाºया ई-आॅफीस प्रणालीमध्ये रिसिप्टची फाईल तयार होत होती; परंतु, एका लॉगीनमधून दुसºया लॉगीनमध्ये फाईल ट्रान्सफर होत नव्हती. त्यामुळे सुरुवातीचे स्कॅनिंग व पहिल्यास्तरावरील प्रक्रिया पूर्ण होत होती; परंतु, त्यापुढे ही फाईल पाठविताना अडचणी निर्माण झाल्या. ई- आॅफीस प्रणालीमध्ये फाईल सेव्ह होत असल्याने या काळात ई-आॅफीस पद्धतीनेच कामकाज करण्यात आले. आॅफलाईन कामकाज झाले नाही. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही प्रक्रिया पूर्ववत झाली. एका लॉगीनमधून दुसºया लॉगीनमध्ये फाईलही ट्रान्सफर झाली. त्यामुळे २२ दिवसांपासून ठप्प पडलेली प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीसचे कामकाज सुरळीत सुरु होईल. मात्र २२ दिवसांच्या कालावधीत ज्या फाईल ई-आॅफीसमधून अपलोड केल्या होत्या, त्या शनिवारी सायंकाळी आढळल्या नाहीत. त्यामुळे या फाईलची प्रतीक्षा प्रशासनाला लागली आहे. ई-आॅफीसमध्ये केलेले सर्व कामकाज हे महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हरवर असते. त्यामध्ये प्रत्येकवेळी बॅकअप घेतलेला असतो. त्यामुळे ज्या फाईल अपलोड झाल्या आहेत, त्याचा बॅकअप उपलब्ध होणार आहे; परंतु, सध्या तरी जुन्या फाईलचा बॅकअप प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला राज्यस्तरावरुन एनआयसी केंद्राशी पाठपुरावा करावा लागणार आहे. २२ दिवसानंतर शनिवारी सायंकाळी ई- आॅफीस प्रक्रिया पूर्ववत झाल्याने अधिकारी- कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सर्वच जिल्ह्यांमध्ये होता तांत्रिक बिघाडपरभणी जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ई- आॅफीस प्रणालीतून केले जाते. मंत्रालयस्तरावर या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणीसह इतर जिल्ह्यातीलही कामकाज ठप्प झाले होते. शनिवारी सायंकाळी या प्रणालीत फाईल अपलोड केली असता, ती व्यवस्थित अपलोड झाली. दुसºया लॉगीनमध्येही ही फाईल ट्रान्सफर झाल्याने ई-आॅफीस प्रणाली पूर्ववत सुरु झाली असल्याची माहिती एनआयसीचे सुनील पोटेकर यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेट