पाथरी (जि. परभणी) : वाशिम येथील शिवसेनच्या खासदार भावना गवळी ( Bhavana Gawali ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या ( ED Raid ) संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. याचा प्रकरणात पाथरी येथील एका कंत्राटदारावर आज दुपारी इडीच्या पथकाने धाड टाकली आले आहे. ( ED raids on contractor near MP Bhavana Gawali )
येथील एकतानगर परिसरातील कंत्राटदार सईद खान ऊर्फ गब्बर यांच्या घरी ३० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांची छापा टाकला. इडीचे पथकाने तीन तास घराची झाडाझडती घेतली आहे. वाशिम येथील खा.भावना गवळी यांच्याशी संदर्भात असलेल्या कामांमध्ये सईद खान यांची भागीदारी असल्याची माहिती मिळाली आहे.
शहरातील एकतानगर भागात कंत्राटदार सईद खान यांचा बंगला आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन बोलोरो आणि एक व्हॅन अशा तीन वाहनाने ईडीचे पथक पाथरीत दाखल झाले. या पथकाने थेट एकतानगर भागातील सईद खान यांचे घर गाठून त्या ठिकाणाचा ५० मीटरपर्यंतचा परिसर सील केला. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांनाही या ठिकाणी प्रवेश देण्यात आला नाही.
हेही वाचा - शिवसेना खासदार भावना गवळी अडचणीत; ५ संस्थांवर ईडीची छापेमारी
वाशिम येथील खा.भावना गवळी यांच्याशी संदर्भात असलेल्या कामांमध्ये सईद खान यांची भागीदारी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच ही धाड टाकल्याची माहितीही पुढे येत आहे. सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत अधिकाऱ्यांची झडती सुरू होती. दरम्यान, नेमकी काय कारवाई झाली, याचा तपशील मिळू शकला नाही.