बैठकीत मराठवाड्यात उद्योग व्यवसाय वाढण्यासंबंधी काय प्रयत्न करता येईल याबाबत चर्चा झाली. मुद्रा लोन संदर्भातील अडचणी कशा सोडवता येतील, एक जिल्हा एक प्रॉड्क्ट, रेल्वे कारखान्याच्या आधारे मराठवाड्याच्या भुमिपुत्रांसाठी वाढणाऱ्या संधी, उमंग ॲपचा फायदा, जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यमातून होऊ शकणारे प्रयत्न, चॅम्पियन पोर्टल बद्दलची माहिती, तसेच रेल्वेचे जाळे वाढविण्याबद्दल चर्चा झाली. प्रदीप पेशकार यांनी विविध जिल्ह्यातून आलेल्या १००हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अक्सपोर्ट ॲॅक्शन प्लॅनवर काम केल्यास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उद्योग वाढण्यास निश्चित सुरुवात होईल. मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रांमध्ये बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्यासाठीचे काम भाजप उद्योग आघाडी करेल, असे समीर दुधगावकर यांनी सांगितले. मराठवाडा सह-संयोजक प्रवीण कस्तुरे, विकास देशपांडे, रमेश सोनवणे, सुशांत भूमकर, शैलेश कऱ्हाळे यांनी आयोजन केले होते. प्रास्ताविक प्रदेश सहसंयोजक सुधीर धुत्तेकर यांनी केले.
युवकांचा कल उद्योगाकडे वाढण्यासाठी प्रयत्न आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:19 AM