शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

परभणीतील प्रकल्पांत आठ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:18 AM

जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पावसाळ्याचा दीड महिना लोटला तरी या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही दाखल झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. एकीकडे पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने चिंतेचे मळभ दाट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पावसाळ्याचा दीड महिना लोटला तरी या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही दाखल झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. एकीकडे पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने चिंतेचे मळभ दाट होत आहे.दोन वर्षापासून जिल्हावासीय पावसाच्या अनियमिततेमुळे वेगवेगळ्या संकटांना तोंड देत आहेत. पावसावर आधारित असलेल्या शेतीत दर वर्षी नुकसान सहन करावे लागत आहे. पावसाळ्यामध्ये खरीप हंगामातील पिकांसाठी पाऊस पडावा म्हणून देवाकडे साकडे घातले जात आहे. तर पाणीसाठा न झाल्याने त्याचा परिणाम उन्हाळ्यात सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्हावासियांना तीव्र स्वरुपाच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. यावर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती बदलली जाईल आणि पाण्याचे संकट कमी होईल, अशी आशा होती. मात्र ही आशा फोल ठरली आहे. पावसाळ्यातील दीड महिन्याचा काळ उलटला. या काळात जिल्ह्यामध्ये ११८.१६ मि.मी.पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १५ टक्के पावसाची नोंद झाली. या दीड महिन्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने जमिनीतच पाऊस मुरला नाही. परिणामी प्रकल्पांमध्ये पाण्यचा एक थेंबही वाढलेला नाही.जिल्ह्यात येलदरी, निम्न दुधना या दोन मोठ्या प्रकल्पांबरोबरच करपरा आणि मासोळी मध्यम प्रकल्प आणि गोदावरी नदीवर बांधलेल्या चार बंधाऱ्यांमधून पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध केली जाते. मागील वर्षी सर्व प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. एकाही प्रकल्पामध्ये जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही.जिल्ह्यातील लघु प्रकल्प वगळता मोठ्या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १९५१.३४ दलघमी एवढी आहे. प्रत्यक्षात सर्व प्रकल्पांमधील पाण्याची गोळा बेरीज केली असता १५६.९७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे हा पाणीसाठा मृत साठ्यातील आहे. त्याची टक्केवार ८ टक्के एवढी आहे.पावसाळ्यातही : ६८ टँकर सुरु४जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त गावांना टँकरच्या सहाय्याने पाणी देण्यात आले. यावर्षी १०९ टँकर प्रशासनाला वापरावे लागले होते. ३० जूनपर्यंतचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता. जून महिना ओलांडून अर्धा जुलै महिना सरला तरी अनेक गावांमधील पाणीटंचाई हटली नाही. परिणामी ६८ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.४त्यात पालम तालुक्यात सर्वाधिक १६, पूर्णा, गंगाखेड तालुक्यात प्रत्येकी १२, जिंतूर १०, मानवत ६, सेलू ५, सोनपेठ, परभणी प्रत्येकी ३ आणि पाथरी तालुक्यात एका टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यातही प्रशासनाला पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.४विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाने टँकरसाठी ७० विहिरी अधिग्रहित केल्या असून टँकर व्यतिरिक्तही ३५९ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली जात आहे.प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा४येलदरी १०१.५५ दलघमी,४निम्न दुधना ५४.४९ दलघमी,४करपरा ०.९३ दलघमी,४कोरडे प्रकल्प : झरी, मासोळी, डिग्रस, मुद्गल, ढालेगाव, मुळी, पिंपळदरी तलावजुलैमध्ये १८ टक्के पाऊस४१ ते १५ जुलै या काळात केवळ १८.६ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जुलै महिन्यामध्ये २१०.८२ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत केवळ ३९.२० मि.मी. पाऊस १५ दिवसांत झाला असून त्यात सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ५२ मि.मी., पाथरी तालुक्यात ५१ मि.मी., मानवत ४३, जिंतूर ४५.१६, पालम ३८.९९, गंगाखेड ३४.२५, पूर्णा ३४.६०, परभणी ३५ आणि सेलू तालुक्यात १७.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.सरासरीच्या तुलनेत केवळ १५ टक्के पाऊस४परभणी जिल्ह्यात दीड महिन्यामध्ये केवळ १५.३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४.६२ मि.मी. असून त्या तुलनेत ११८ मि.मी.पावसाची नोंद जिल्ह्यामध्ये झाली आहे.४ त्यात मानवत तालुक्यात सर्वाधिक १४८.६७ मि.मी., सोनपेठ तालुक्यात १३९.५० मि.मी., गंगाखेड १३२.५०, जिंतूर १२९.१६, पूर्णा १२४.२०, परभणी १०६.७५, पाथरी १११, पालम ९७.६६ आणि सेलू तालुक्यात ७४ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीची तुलना करता सेलू तालुक्यात केवळ ९.१ टक्के पाऊस झाला आहे.४सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक २० टक्के, पाथरी तालुक्यात १४.४ टक्के, जिंतूर १५.९ टक्के, पालम १४ टक्के, मानवत १८.२ टक्के, गंगाखेड १९ टक्के, पूर्णा १५.४ टक्के आणि परभणी तालुक्यात १३.३ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीRainपाऊस