परभणी: शासनाच्या राज्य सेवा आयुक्तालयाने जिल्ह्याला ११ नवीन रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजलीताई गंगाप्रसाद आणेराव यांनी दिली.
राज्यातील आरोग्य संस्थांसाठी नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केली. या घोषणेनुसार रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या असून, त्यातील ११ रुग्णवाहिका जिल्ह्याला मंजूर झाल्या आहेत. त्यात परभणी तालुक्यासाठी ३, पाथरी तालुक्यासाठी ४, मानवत तालुक्यासाठी २, जिंतूर तालुक्यासाठी १ आणि सोनपेठ तालुक्यासाठी १ रुग्णवाहिका दिली जाणार आहे. परभणी तालुक्यातील दैठणा, पेडगाव, झरी, पाथरी तालुक्यातील बाभुळगाव, हादगाव, पाथरगव्हाण, वाघाळा, मानवत तालुक्यातील कोल्हा, रामपुरी, जिंतूर तालुक्यातील आडगाव व सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका दिली जाणार असल्याची माहिती सभापती अंजलीताई आणेराव यांनी दिली.