परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीच्या कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. या परिसरात पावसाचे आणि नाल्याचे पाणी साचले आहे. प्रवेशद्वारातच चुकीच्या पद्धतीने मुरूम टाकण्यात आला. स्थानकाच्या संरक्षण भिंतीला लागूनच दोन्ही बाजूंनी ऑटो स्टँड आहे. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. संपूर्ण ऑटोस्टँडच पाण्याखाली असल्याने ऑटो चालकांना वाहने उभी करता येत नाहीत. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. परिवहन महामंडळ, महापालिका आणि जिल्हा प्रशासन या संबंधित यंत्रणेने तात्काळ बसस्थानक परिसरातील सोयी-सुविधा निर्माण करून प्रवाशांची तसेच ऑटोचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संभानाथ काळे, उपशहरप्रमुख मारुती तिथे, उद्धवराव मोहिते, केदार दुधारे, शिवाजी आव्हाड, विजयराव खिस्ते आदींसह रिक्षाचालक, शिवसैनिक उपस्थित होते.
बसस्थानक परिसरातील समस्या दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:22 AM