परभणी : शहरातील पू.ना.गाडगीळ अँड सन्स येथे झालेल्या सोन्याच्या अपहार प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये परभणी पोलिसांनी एक कोटी ७५ लाख ६९ हजार ५८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पु.ना.गाडगीळ अँड सन्स परभणी येथे तीन कोटी ७१ लाख तीन हजार २२६ एवढ्या रकमेच्या सोन्याचा अपहार झाल्याचा गुन्हा नवा मोंढा ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक चंद्रकांत प्रल्हादराव कारवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची व्याप्ती रक्कम पाहून हा गुन्हा पोलीस अधीक्षक यांनी आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर यांनी केला.
सोने तारण ठेवून घेतले तीन टक्के दराने पैसेसदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी तत्कालीन शाखा व्यवस्थापक विजय थोरात (रा.तळेगाव फाटा, संगमनेर) यास नवा मोंढा पोलीसांनी पूणे येथून ३१ मार्चला रात्री अटक केली. या आरोपीस १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. या आरोपीने त्याच्या गुन्ह्यातील अपहार केलेले सोने हे गुन्ह्यातील दुसरा आरोपी अक्षय डहाळे (रा.परभणी) यांच्याकडे तारण ठेवून तीन टक्के दराने पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यास देखील पोलिसांनी अटक केली आहे.
३३४५ ग्रॅम वजनाचे सोने ताब्यात या आरोपीच्या ताब्यातून फसवणुकीत गेलेल्या मालापैकी ३३४५ ग्रॅम वजनाचे सोने अंदाजे किंमत एक कोटी ७३ लाख ८९ हजार ५८ रुपये व रोख रक्कम असा एकूण एक कोटी ७५ लाख ६९ हजार ५८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.