शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

वेतनासाठी परभणी मनपातील कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 4:30 PM

तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.

ठळक मुद्देमहानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याही प्रलंबित असल्याने स्वच्छता विभागातील कायम व रोजंदारी कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

परभणी : तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.

१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. विशेष म्हणजे वेतनाच्या मागणीसाठी ३ एप्रिल रोजी संघटनेचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासनही दिले. परंतु, अद्यापपर्यंत मागण्यांची पुर्तता झाली नाही. सणासुदीच्या काळात वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याही प्रलंबित असल्याने स्वच्छता विभागातील कायम व रोजंदारी कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. येथील महापालिकेच्या कार्यालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून वेतनाची मागणी केली.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कामगारांनी बोलून दाखविला.  कायम व रोजंदारी सफाई कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन अदा करावे, सफाई कामगारांना १२ व २४ वर्षांच्या पदोन्नतीसाठी जात पडताळणीची अट रद्द करावी, रोजंदारी कामगारांना विना अट सेवेत कायम करावे, सफाई कामगारांना आकृतीबंधानुसार सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक पात्रतेनुसार मुकादम, शिपाई, वाहन चालक, लिपीक पदावर पदोन्नती द्यावी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी द्यावी, कामगारांना घरे बांधून द्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी शहर महानगरपालिका सफाई कामगार संघटनेचे अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाखळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनMuncipal Corporationनगर पालिकाMONEYपैसाEmployeeकर्मचारी