परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अॅन्टीबायोटिक औषधींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकार्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात ग्रामीण भागातील हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णांवर उपचार केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडूनच औषधींचा पुरवठा केला जातो. मात्र दोन ते तीन महिन्यांपासून रुग्णालयामध्ये औषधींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच सध्या काही दिवसांपासून सलाईनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार केल्यानंतर आवश्यक ती औषधी लिहून देताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना अॅन्टीबायोटिक औषधी द्यावी लागते. मात्र याच औषधींचा सध्या रुग्णालजात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सर्रास बाहेरुन औषधी विकत घ्यावी लागत आहे. काही सामाजिक संस्थांनी रुग्णालय प्रशासनाला तुटवडा जाणवत असल्याने अॅन्टीबायोटिक औषधींचा पुरवठा केला होता. परंतु, तो ही अपुरा पडला. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधी उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी रुग्णांतून होत आहे.
सीटी स्कॅनही बाहेरूनच येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास तीन वर्षापासून सीटी स्कॅन मशीन उपलब्ध नाही. जी मशीन कार्यरत होती. तीचे आयुष्य संपल्यामुळे ती नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे हलविण्यात आली आहे. मात्र त्या जागी अद्यापपर्यंत दुसरी मशीन कार्यान्वित करण्यात आली नाही. परिणामी जिल्हा सामान्य रुग्णालयात येणार्या रुग्णांना तीन वर्षापासून सीटी स्कॅन बाहेरुन करुन आणावा लागत आहे. यासाठी मोठी आर्थिक झळही रुग्णांना बसत आहे. परंतु, यावर केवळ पत्रव्यवहार चालू आहे. ठोस पर्याय निघत नाही. त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सीटी स्कॅनमशीनसाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.
एक्स-रे मशीनवर भारजिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीन ही कमी क्षमतेची असल्यामुळे अनेक रुग्णांना एक्स-रे काढताना अडचणी येत आहेत़