...तर वाहनमालकांवर कारवाई
शहरात वाहतूक शाखेच्यावतीने दररोज बाजारपेठ भागात फिरुन वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावरील वाहनांविरुद्ध जप्तीची कारवाई करतात. दंड वसूल करतात; मात्र तरीही दररोज बाजारपेठ भागात ही परिस्थिती कायमस्वरूपी दिसून येते. चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांवर मात्र मोठ्या प्रमाणात ही कारवाई होते.
घरासमोर रस्त्यावर लावलेल्या चारचाकी गाड्यांसंदर्भात मात्र वाहतूक शाखेकडे तक्रारी येत नाहीत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर लावलेल्या या वाहनांवर कारवाई होत नाही. नो पार्किंगच्या जागेत वाहन उभे केल्यास त्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. तशा प्रकारे वाहनधारकांकडून दंड वसूल केला जातो.
कच्छी बाजार रस्ता सर्वात त्रासदायक
शहरातील कच्छी बाजार रस्त्यावर ही समस्या सर्वात अधिक आहे. संपूर्ण बाजारपेठेचा हा रस्ता असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कायमस्वरूपी जड वाहने, तसेच चारचाकी वाहने उभी केली जातात. त्याचा त्रास वाहतुकीला होतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.