शरीरात पाणी कमी पडले तर
शरीराच्या रचनेनुसार प्रत्येक वयोगटाने दिवसाला २ ते ३ लीटर पाणी प्यावे. तेही दिवसभरात ठराविक अंतराने. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी पडले तर शरीर थकते. यातून डिहायड्रेशन होते. शरीराला थकवा जाणवू नये, यासाठी संतुलित आहार आणि पाणी यांचे प्रमाण सारखे असावे.
शरीरात पाणी जास्त झाले तर
वैद्यकीय शास्त्रानुसार प्रत्येकाला अतिरिक्त पाणी पिण्याची गरज नाही. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. अति प्रमाणात पाणी प्यायल्याने विविध आजारांना आमंत्रण मिळते. यातून काहींना वात, कफ, सर्दी यांसारखे दोष शरीरात निर्माण होतात.
तज्ज्ञ काय म्हणतात...
जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यावर किडनीवर परिणाम होतो. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपताना फक्त कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहाते. अति पाणी प्यायल्याने अग्निमंद होतो. यामुळे भूक लागत नाही. अवेळी पाणी पिणे टाळावे. - डाॅ. नरेंद्र ब्रम्हपूरकर, आयुर्वेद तज्ज्ञ.
कोणी किती पाणी प्यावे
वयोगट दिवसाला किती पाणी (लीटर)
नवजात ५ ते ६ कप
१२ वर्षांपर्यंत २.५
१६ ते २९ २.५
३१ ते ४० ३
४१ ते ६० ३
६१ पेक्षा जास्त २.५