परभणी: शहरातील संजय गांधीनगर भागात एकाकडून गुरुवारी १ देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केल्यानंतर शुक्रवारीही परभणी-पाथरी रस्त्यावर एका युवकाकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
परभणी-पाथरी रस्त्यावर एका बारच्या परिसरात एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती स्थानिका गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून स्थागुशाच्या पथकाने शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक तरूण रस्त्याने जात असल्याचे त्यांना दिसले. पथकातील कर्मचाऱ्यांनी या तरूणाची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आले. त्याने त्याचे नाव जावेद ख़ाँन असे सांगितले. त्यानंतर या आरोपीस पकडून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जयंत मीना व अप्पर पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्या मार्गदरशना खाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक बापूराव दडस, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,नीलेश भुजबळ,राहूल चिंचाणे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड़, फारुखी,अजहर पटेल, विष्णु भिसे, दिपक मुदिराज, कांबळे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्रीही परभणी शहरातील संजय गांधी नगर भागात किरायाने राहणारा आरोपी बबलू शेख याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केले होते. सलग दुसऱ्या दिवशीही एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.